TESTIMONIALS

TESTIMONIALS

श्री विजय बाळासाहेब पावबाके
प्राथमिक शिक्षक , डहाणू.

सुमारे 3 वर्षांपासून मी पेन्स सहयोग फाउंडेशन शी जोडलो गेला आहे .आशाए प्रोजेक्ट, पेंट अ स्कूल प्रोजेक्ट, पणती सजावट कार्यशाळा , गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी शाळेस सहाय्य , कोविड 19 राज्यस्तरीय स्पर्धेस सहकार्य , या व इतर अनेक उपक्रमासाठी आपले अनमोल सहकार्य त्वरित लाभले आहे. आशाए प्रोजेक्ट मुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे . तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या उपक्रमाचा खूप फायदा झाला . पेंट अ स्कूल प्रोजेक्ट मुळे भौतिक दृष्ट्या तालुक्यातील अनेक शाळांचा कायापालट झाला आहे. अल्पावधीतच डहाणू तालुक्यामध्ये  शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले कार्य खूप विस्तारले आहे. डहाणू  तालुका , पालघर जिल्हाच नव्हे तर राज्यभरात देखील आपल्या पेन्स सहयोग फाउंडेशनचे कार्य विस्तारत आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास खूप खूप सदिच्छा. आपले सहकार्य आम्हाला कायम लाभत राहील हा विश्वास आहे.


We accept donations from individuals, groups, organizations, firms, and corporates. You may donate the desired amount directly to Pens Sahyog Foundation’s bank account.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *