TESTIMONIALS


श्री विजय बाळासाहेब पावबाके
प्राथमिक शिक्षक , डहाणू.

सुमारे 3 वर्षांपासून मी पेन्स सहयोग फाउंडेशन शी जोडलो गेला आहे .आशाए प्रोजेक्ट, पेंट अ स्कूल प्रोजेक्ट, पणती सजावट कार्यशाळा , गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी शाळेस सहाय्य , कोविड 19 राज्यस्तरीय स्पर्धेस सहकार्य , या व इतर अनेक उपक्रमासाठी आपले अनमोल सहकार्य त्वरित लाभले आहे. आशाए प्रोजेक्ट मुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे . तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या उपक्रमाचा खूप फायदा झाला . पेंट अ स्कूल प्रोजेक्ट मुळे भौतिक दृष्ट्या तालुक्यातील अनेक शाळांचा कायापालट झाला आहे. अल्पावधीतच डहाणू तालुक्यामध्ये  शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले कार्य खूप विस्तारले आहे. डहाणू  तालुका , पालघर जिल्हाच नव्हे तर राज्यभरात देखील आपल्या पेन्स सहयोग फाउंडेशनचे कार्य विस्तारत आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास खूप खूप सदिच्छा. आपले सहकार्य आम्हाला कायम लाभत राहील हा विश्वास आहे.


शंकर आमटे
जि.प शिक्षक ग्यालनपाडा , डहाणू.

PENS SAHYOG FOUNDATION दुर्गम भागातही एक दीपस्तंभ दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासोबतच त्यांच्या गुणवत्ता विकास करण्यामध्ये मागील कित्येक वर्षापासून PENS SAHYOG FOUNDATION चा सिंहाचा वाटा आहे.
🎯 गुरुकिल्ली 🎯
या उप्रमाच्या माध्यमातून
१.नवीन वर्गखोली बांधकाम
२. नवीन शौचालय बाधकाम
३.SCHOOL BAG वितरण, ४.स्टेशनरी वाटप,
५.शिक्षक कमी असलेल्या शाळेवर स्वयसेवक देऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शाळांना आणि मुलांना आपल्या मार्फत मोठी मदत होत आहे
🎯 Magical Library🎯
या उपक्रमाच्या माध्यमातून
6 ते 8 या इयत्ता मधील मुलांच्या
गणित, भाषा विज्ञान आणि इंग्रजी या विषया मधील मागे असणाऱ्या क्षमता शोधून, विद्यार्थी आकलन मध्ये असणाऱ्या अडचणी शोधून त्यांना स्वयसेवका मार्फत मार्गदर्शन करून गुणवत्ता विकास करणे,
परिसर भेट विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे मोठ्या वर्गातील मुलांना यांच्या मधील न्यूनगंड नाहीसा होऊन गुणवत्ता विकासास मदत होत आहे.
🎯 प्रारंभ नर्सरी 🎯
या उपक्रमाअंतर्गत ,
1.दुर्गम भागातील मुलांना फळझाडांचे वाटप करणे, 2.त्यांचे योग्य संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शन करणे , 3.चांगले सवर्धन करणाऱ्या मुलांना बक्षीस देणे,
4.चीमण्यासाठी घरटे तयार करणे. या सारख्या उपक्रमांमधून पर्यावरणाचे रक्षण केले जात आहे.
🎯 सक्षम 🎯
या सारख्या उपक्रमांमधून
१.शिवणकाम
२.सुतारकाम
३.प्लबिंग
सारख्या कोर्सेस च्या माध्यमातून
स्थानिक महिला/ पुरुष यांना रोजगानिर्मिती करून स्वतःच्या पायावर उभा करणे,
हे आणि या सारखे विविध उपक्रम राबवून दुर्गम भागात शिक्षण पर्यावरण रोजगार आणि महिला सक्षमीकरण केले जात आहे.
या पुढील काळात देखील आपल्या मार्फत असेच सामाजिक कार्य सतत सुरू राहो या साठी शुभेच्छा💐💐

We accept donations from individuals, groups, organizations, firms, and corporates. You may donate the desired amount directly to Pens Sahyog Foundation’s bank account.